किड नियत्रंण

झाडाचि फादि वाळूण झाडे जळुण जाऊ राहिले. 20 झाडे जळुण गेली आहे. व 5 नविण सुकले आहे उपाय सांगा.

मर रोग व फांदी मर या रोगाची लक्षणे वाटत आहे.

१) जमीनीत चुनखडीचे प्रमाण ५% पेक्षा जास्त असल्यास मर रोगाचे प्रमाण देखील दिसू लागतात.
२) सफरचंद हे पिक थंड वातावरणात येणारे फळपिक आहे आपल्या भागात म्हणजेच नाशिकचे निफाड भाग वगळता महाराष्ट्रातील उर्वरित भागात यशस्वीचे प्रमाण कमी असू शकतात.
३) झाडांना आवश्यक ते वातावरण मिळत नसल्यास देखील मर रोगाचे प्रमाण दिसू शकतात.

रोग व्यवस्थापन
१) फळपिकात जास्तीत जास्त जैविक व बायोस्लरीचा वापर करावा त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढून पिकांना आवश्यक त्या प्रमाणात मुलभूत अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात.
२) वाळलेली झाडे त्वरित काढून नष्ट करावीत. त्यामुळे नवीन रोपांना लागण होणार नाही.
३) सध्या वाळलेल्या फांद्याची व झाडांची छाटणी करावी.
३) छाटणी केलेल्या झाडांना १% बोर्डो पेस्ट लावावीत.
४) ज्या झाडांना रोगांची लागण झालेली नाही अशा झाडांना त्वरित ट्रायकोड्रामा व्हीरीडी @१०० ग्रॅम + ५ लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळे पद्धतीने आळवणी घालावी.
५) ५-६ दिवसाच्या अंतराने ब्लू कॉपर @२ किलो+ २०० लिटर पाण्यात मिसळून प्रती एक एकर क्षेत्रासाठी सोडावे.