- मोझॅक ( Mosaic): या रोगाची लक्षणे नवीन पानावर दिसत आहे. या अवस्थेत रोगावर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे.
. या रोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडीमुळे होतो.
नवीन लागवड करताना खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
- रोगाचे नियंत्रण: पुढील उपायांचे अनुसरण करून, रोगाची तीव्रता कमी केली जाऊ शकते.
- रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करून बाग स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
- नवीन बाग लागवड करतेवेळी, निरोगी आणि रोगविरहित रोपांची निवड करावी.
- रोगग्रस्त झाडे कोणत्याही उपायाने निरोगी होऊ शकत नाहीत त्यामुळे रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे आवश्यक आहे.
- पपई पिकाभोवती सापळा पीक म्हणून ज्वारी/मका पिकाची लागवड करावी. त्यामुळे मावा किडीचा होणारे प्रसार टाळता येते.
- अन्यथा, या विषाणूचा कायमचा स्रोत झाडांवर टिकून राहतो, यामुळे एकाच वेळी इतर झाडांवर या रोगाचा प्रसार होत राहतो.
- रोगवाहक किडींच्या (मावा) नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% एसएल ०.३ मिली प्रति लीटर पाण्याच्या प्रमाणाने १० ते १२ दिवसांच्या अंतराने पिकावर फवारणी करणे गरजेचे आहे.