खरीप पिकांवर वाढतोय करडे ढेकूण किडीचे प्रादुर्भाव

सध्या कापूस आणि सोयाबीन पिकावर वरील (करडे ढेकूण/राखाडी ढेकूण)किडीचा प्रकोप खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे, ही कीड पानांची कडा कुर्तडते व नंतर संपूर्ण पान कुरतडून टाकण्याचे काम करते, परिणामी पाने अन्नद्रव्य तयार करण्यात अडचण निर्माण होते व रोपे अवस्थेत झाडांची वाढ खुंटते.

उपाययोजना
१) लागवड झाल्यानंतर २०-२५ दिवसांनी हलकी कोळपणी करावी.
२) फिप्रोनील ०.३% (फरटेरा)@३ किलो + शेणखत@१०० किलो/एकर कोळपणीपूर्वी शेतात पसरून द्यावे.
३) पीक वाढीच्या अवस्थेत असताना निंबोळी तेल@३० मिली किंवा दशपर्णी अर्क @१५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) करडे ढेकूण कीडीवर २०% क्लोरोपायरीफॉस असलेले कीटकनाशकाचे परिणाम सध्या मिळत नाही, त्वरित कीड नियंत्रण करीता क्लोरोपायरीफॉस ५०% सायपर मेथ्रीन ५% (हमला)@२५ मिली किंवा क्लोथोडीयन ५०% (डेंटसु) @१० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५% @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) जस-जशी पिकांची वाढ हिट जाईल तसे या किडीचे प्रकोप हळू-हळू कमी होत जाते.
6)करडे ढेकूण किडीवर जैविक जालीम उपाय तरी सध्या उपलब्ध नाहीत पण काही प्रमाणात किडीचे नुकसान टाकता येऊ शकते.