मिरची वरील व्हायरस येत आहे

मिरची वरील व्हायरस येत आहे

1 Like

मिरची वरील चुरडा - मुरडा

मिरची वरील चुरडा- मुरडा रोगाची लक्षणे दिसत आहे, या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो.
मिरची वरील चुरडा मुरडा रोगाचा प्रसार फुलकिडे व लाल कोळी या रस शोषक किडीमार्फत होतो.

कीड एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास नियंत्रण मिळवता येईल.

उपाययोजना:
१) एकदा व्हायरस आला कि त्यावर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण जाते. त्याकरिता सुरुवातीपासून जास्तीत जास्त गांडूळखत/शेणखत/जैविक स्लरी/ जीवाणू खते देणे अत्यंत गरजेचे आहे.

२) नियंत्रणासाठी cyantraniliprole १०.२६ % OD ( बेनेविया ) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . वरील फवारणीनंतर १० दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा वरील सांगितल्याप्रमाणे फवारणी करावी.

३) शेतात एकरी @२० पिवळे - निळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.

४)प्रादुर्भाव ग्रस्त झाडे त्वरित काढून नष्ट करावे.

५) लाल कोळी नियत्रण करिता प्रोपीगेट ५७% (ओमाईट ) @५० मिली किंवा सायनोपायराफेन 30 % SC (कुनोची)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

६) फुलकिडे नियत्रण करिता फिप्रोनील ५% SC (रीजेंट) @ ३० मिली किंवा फिप्रोनील ८०% (जंप) @४ ग्रॅम किंवा सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @४० मिली किंवा स्पिनोसॅड ४५% SC (ट्रेसर)@ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

७) फुलकिडे व कोळी एकत्रित नियत्रण करिता एथिओन ५० % EC @२० मिली किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ३०% @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

८) सध्या पाण्यात विरघळणारे खते देणे टाळावे.
९) प्रत्येक फवारणीमध्ये निंबोळी अर्क आणि सिलिकॉन बेस स्टीकर घेणे आवश्यक आहे.

हि फवारणी किती प्राईज मध्ये बसेल

वरील सर्व एकाच वेळी फवारणी करण्याची आवश्यकता नाही. कमी खर्चात बसेल.