सोयाबिन

उपाय

1 Like

वाणी किडीची लक्षणे आहेत:

I. उपयोजना:
पिक लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी हलकी वखरणी करावी. (पिक ३० ते ३५ दिवसापर्यंत दोन ते तीन कोळपणी करणे गरजेचे आहे.)
पेरणीपूर्वी पिकांचे अवशेष व पालापाचोळा गोळा करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावेत किंवा नष्ट करून शेत स्वच्छ करावे.
वाणी/पैसा जास्त प्रमाणात बांधावरील बारीक झुडुपे,गवत व तणांत ओलाव्याला राहते. त्यामुळे पावसाळ्यात बांधावरील गवत नष्ट करून बांध नेहमी स्वच्छ ठेवावेत.
समूहात आढळणाऱ्या कीड फावड्याच्या सहायाने किंवा हातात हातमौजे घालून वेचून नष्ठ करावे.
तुट किंवा खाडे भरणी करत असताना बियाण्याबरोबर दाणेदार मिश्रित किटकनाशके टाकावे. किटकनाशकाच्या वासाने वाणी/ पैसा किडीचे उपद्र्व्य कमी होण्यास मदत होईल.
कीड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरपायरिफॉस (२० ईसी)@३० मिली किंवा क्लोरपायरिफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी @१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (वरील कीटकनाशक मिलीपेड या किडीवर शिफारीश नाही परंतु कापूसपिकावरती आहे).
फवारणी करताना पंपाचे नोझल काढून ‘ड्रेंचिंग’ करावे. जेणेकरून रोपांच्या मुळाजवळ कीटकनाशक पोचण्यास व बुंध्यालगत मातीत असलेल्या किडीचा नायनाट होण्यास मदत होईल.
कार्बोसल्फान १०% दाणेदार, क्लोरोपायरीफॉस १०% दाणेदार किंवा फिप्रोनील ०.३% @५ किलो/१०० किलो शेणखतात मिसळून ओळीने रोपांच्या बुढक्याला टाकावे.
1 Like