गवार ची वाळुन जात आहे भेंडीची पाने कश्यामुळे अशी झाली आहेत कॄपया मला मार्गदशन करावे ही विनंती आहे

गवारीचे पाने कश्यामुळे अशी झाली आहेत कॄपया मला मार्गदशन करावे ही विनंती आहे

कॉलर रॉट/रुट रॉट (मूळ कुज) किंवा मर रोगाची लक्षणे असू शकतात
**जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असणे, जमिनीचा सामू कमी असणे आणि जास्त तापमान रोग वाढीस कारणीभूत ठरतात.
न कुजलेले काडीकचरा पेरणीदरम्यान जमीनच्या पृष्ठभागावर उपलब्ध असणे आणि पेरणी दरम्यान आणि रोपे अवस्थेत जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असणे.

गवार पिकाची रोपे अवस्था व फुलोरा अवस्थेत मर रोग व मूळ कुज रोगाची लक्षणे दिसतात.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.