अळी कृतत. आहे या साठी उपाय सांगा
कातरकीडचे लक्षणे असू शकतात.
कातरकीड संध्याकाळी किंवा रात्री रोपांचे मूळ लगत भाग कट करून उपजीविका करतात.
किडीची तीव्रता जास्त असल्यास खालील उपाययोजना कराव्यात.
१)कातरकीड रोपे बुडापासून कुरतुडून उपजीविका करतात. तशी लक्षणे असल्यास रोपांच्या बुडाला संध्याकाळी क्लोरोपायरीफॉस २०% @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या बुडाला आळवणी घालावी.
२) प्रत्येक रोपांच्या खोडाला निंबोळी पेंढ @२० ग्रॅम + गांडूळखत @५० ग्रॅम/रोपटे या प्रमाणात घेऊन टाकावे.
जमिनीचा तापमान वाढल्यास रोपांची खालची पाने पिवळी पडतात.
उपाययोजना:
१) मल्चिंग पेपरला रोपाच्या शेजारी दोन तीन बारीक छिद्र करावे त्यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.
२) जास्तीत जास्त जीवाणू खते व अन्नद्रव्य स्थिरीकरण जीवाणू मातीत मिसळून द्यावे.
३) जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @३ किलो + हुमिक असिड @२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.