आम्ही करतोय टोकन/ बीबीएफ पद्धतीने सोयबीन पेरणी तुम्ही पण करा व हमखास उत्पन्न वाढवा

‘बीबीएफ’ पद्धतीचे वैशिष्ट्यपुर्ण फायदे :

उत्पादनामध्ये १० ते २५ टक्के पर्यंत वाढ होते.
टोकण पध्दतीने लागवड केली जात असल्याने दोन रोपांमधील अंतर राखले जाते.
बियाण्यांची १५ ते २० टक्के पर्यंत बचत होते.
‘बीबीएफ’ पद्धतीमध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवून मातीत ओलावा जास्त काळ टिकवून ठेवते.
पडणाऱ्या पावसाच्या पाण्यास उताराच्या दिशेने वाहून जाण्यास अटकाव करते
जमिनीची धूप कमी करून जमिनीतील ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते.
‘बीबीएफ’ पद्धतीमुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आवश्यकतेपेक्षा जास्त झालेले पाणी सऱ्यांमधून वाहून नेले जाते व पीक पाण्यात डुंबून संपूर्ण नुकसान होण्यापासून बचाव होतो.
याउलट हे शेतातले पाणी शेतामध्येच मुरविल्यामुळे पावसाच्या दीर्घ खंडाच्या वेळी या जास्त झालेल्या पाण्याचा (ओलाव्याच्या स्वरूपात) पिकासाठी उपयोग होतो.
रुंद वाफ्यावर पिकाची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणाऱ्या खोड व मूळ कुजव्या रोगांचा प्रादुर्भाव टाळला जातो.
पिकाची रुंद वाफ्यावर लागवड केली जाते, त्यामुळे सऱ्यांचा उपयोग करून आंतरमशागतीची कामे सुखकररीत्या करणे शक्य होते.
पिकाला पाणी देणे, ठिबक संचाचा पाण्यासाठी वापर करणे, तण नियंत्रण, कीटकनाशक फवारणी इ. कामे योग्य रीतीने करणे शक्य होते.
पिकामध्ये हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही.

पिकांच्या लागवडीसाठी ‘बीबीएफ’ यंत्र व त्याची वैशिष्ट्ये :

पेरणीची खोली आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची व्यवस्था या यंत्राला उपलब्ध करून देण्यात आली आहे
या यंत्राला पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर कमी जास्त करण्याची सोय करून देण्यात आली आहे.
हे बहुपयोगी यंत्र असून ते खरीप व रबी हंगामातील पिकांची आवश्यकतेनुसार सऱ्या पाडून पेरणी करण्यासाठी सहजासहजी वापरता येते.
गाळाच्या किंवा चोपण जमिनीमध्ये पाण्याचे पाट पाडण्यासाठी ३० ते ३५ पीटाओ एचपीच्या ट्रॅक्टरद्वारे योग्य रित्या चालविता येते.
या यंत्राद्वारे पाडलेल्या सऱ्यांमधून पिकाला आवश्यक तेव्हा पाणी देता येते.
आवश्यकतेनुसार फणांची संख्या वाढविता येते अथवा कमी करता येते.

3 Likes