सध्या छाटणी झाल्यावर खोडला १% बोर्डो पेस्ट लावावी.
अंतरमशागत करून शेत तणमुक्त ठेवावीत.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन:
- शेवग्याच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडाला दरवर्षी १० किलो/ झाड या प्रमाणात चांगले कुजलेले
शेणखत मातीत मिसळून द्यावे. - १०० ग्रॅम युरिया, ४०० ग्रॅम सुपर फॉस्फेट व २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत.
- ठिबद्वारे प्रत्येकी १५ ते २० दिवसांनी जीवामृत @२०० लिटर प्रति एकर या प्रमाणात घेऊन आळवणी करावी.
- फुलोरा अवस्थेत आल्यास अधूनमधून अमृतपाणी २ लिटर /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- कीड व्यवस्थापन करिता वेळोवेळी फार्म प्रीसाईज मोबाईल अॅप चे मार्गदर्शन घ्यावेत.
1 Like