लागवड कशी करावी

लागवड पद्धत सांगा

सोयाबीन पेरणी कशी करावी?

शेतकरी बंधुनो सोयबीन पेरणी करताना जर घरचे बियाणे वापरत असाल तर उगवणक्षमता तपासणे व बीजप्रक्रिया करणे खूप आवश्यक आहे.

उगवण क्षमता तपासणी करताना घरचे बियाणे वापरायचे झाल्यास मुठभर सोयबीन घेऊन १०० बिया पाण्यात ५ ते १० मिनिटे भिजवाव्यात. टरफलावर सुरकुत्या पडलेले बियाणे वेगळे करून मोजावे. शंभर बियापैकी साधारण: ७० बियांना सुरकुत्या पडलेल्या असल्यास बी पेरणीयोग्य आहे असे समजावे.

बीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया करताना पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. प्रथम ट्रायकोड्रामा व्हीरीडी @२५ ग्रॅम/किलो व नंतर रायझोबीयम @२५०ग्रॅम/१० किलो बियाणे या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी व बियाणे पेरणी करता वापरावे.

पेरणीकरताना मध्यम ते भारी जमीन, पावसाच्या योग्य निचरा होणारी जमीन निवडावी.

पेरणी करताना खूप लवकर किंवा खूप उशिरा न करता तुमच्या भागात तीन मोठे पाऊस झाल्यानंतर (१ ते दीड तासाचे पाऊस) व तापमानात घट झाल्यानंतर जमिनीची ओल साधारण १०-१५ इंच खोलीपर्यंत पोहचल्यावर करावी.

पेरणीपद्धत:

पारंपारिक पद्धत: या पद्धतीमध्ये शेतकरी आपल्या घरी उपलब्ध असलेले पेरणी अवजारच्या पद्धतीने करतात दोन ओळीतील अंतर ४५ सेमी असते व दोन रोपांतील अंतरावर नियंत्रण हे पेरणी करणाऱ्या व्यक्तीची असते. या पद्धतीमध्ये बियाण्याचे प्रमाण ३० किलो/एकर लागतात.व एकरी उत्पन्न ७-८ क्विंटल येतो.

प्रचलित पद्धतीमध्ये पेरणी करताना टोकन पद्धत वापर करून जोड जोळ पद्धतीत पेरणी करण्यासाठी बैलजोडी किंवा ट्रॅक्टरचलित यंत्राने काकऱ्या पाडून घ्याव्यात. या नंतर मजूराच्या मदतीने किंवा टोकन यंत्राच्या मदतीने पेरणी करावी. बीबीएफ यंत्र उपलब्ध नसेल तर गादी वाफ्यावर करावी.