आंबा बहार

आंब्याला बहार येण्याऐवजी असे झाले आहे त्यावर उपाय काय करावा?

आंबा पिकावरील पर्ण गुच्छ (mango Molformation) फ्युसेरियम मोनिलिफॉर्म या बुरशीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो.

उपाययोजना:
१) नवीन लागवड करत असल्यास रोग मुक्त कलम वापरावीत.
२) रोगग्रस्त फांदी काढून नष्ट करावीत.
३) ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात प्लनोफ़िक्ष (NAA)४ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)वरीलप्रमाणे नियोजन केल्यानतर कार्बेन्डेझिम ५०% WP@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) पावसाळयापूर्वी व मोहोरलागण्यापूर्वी रोगग्रस्त फांद्या काढून नष्ट करावीत. तसेच १% बोर्डोपेस्ट खोडावर लावावे.