ऊस

ऊसाच्या खोडापाशी जास्त गवत झाले आहे तरी कोणते औषध वापरावे ते सांगा गवत सुकले पाहिजे

1 Like

शक्य झाल्यास खुरपन करून तण व्यवस्थापन करावे. तसेच अंतरमशागत करून शेत तण विहरीत ठेवावीत.

सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने तण नियंत्रण करिता तणनाशकांचा वापर केल्यास ऊस पिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

तणनियंत्रण करिता डायूरेक्स (Diuron 80% WP) @ ग्रॅम + २-४ डी ५८% @१०० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes