1 Like
कुकुम्बर मोसैक व्हायरस रोगाची लक्षणे आहे.
या रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो.
रोगवाढीस अनुकूल घटक:
- सततचे ढगाळ वातावरण, सतत पाऊस, कमी तापमान, जास्त आर्द्रता हे घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात. यासोबतच रोगयुक्त लागवड साहित्य, तण नियंत्रणाचा अभाव, अन्नद्रव्यांची कमतरता हे घटक रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहेत.
- रोगाचा प्राथमिक प्रसार लागवड साहित्यामार्फत आणि दुय्यम प्रसार ‘मावा’ किडीमार्फत होतो.
- या विषाणूची जवळपास ८०० ते १००० यजमान पिके आहेत. यात काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, - चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची तसेच एकदल व द्विदल पिकांचा समावेश होतो.
- पीक फेरपालट पद्धतीचा अभाव हे देखील प्रमुख कारण आहे.
उपाययोजना
विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते. त्यामुळे रोगाचा प्रसार रोखणे शक्य होते.
- पिकांची फेरपालट आवश्यक.
- रोगमुक्त उतिसंवर्धित रोपे वापर किंवा रोगमुक्त बागेतून चांगली मातृवृक्ष निवडून त्यांचे कंद लागवडीसाठी वापरावीत.
- प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत.
- लागवडीपूर्वी कंद किंवा रोपांवर शिफारशीत कीडनाशकांची फवारणी आणि कंदावर प्रक्रिया अवश्य करावी.
- बागेभोवतीचे रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यांसारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत.
- बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी.
- बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकांची लागवड करू नये.
मावा किडीच्या नियंत्रण करिता फ्लोनिकामाईड ५०% @१० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.