मोसंबी पीक व्यवस्थापन: (में- जून)
१) सर्वप्रथम में महिन्यात झाडांना पाणी व्यवस्थापणात एक वर्षाची झाडे असल्यास १५-२० लिटर/झाड या प्रमाणत पाणी व्यस्थापन करावे.
२) झाडाभोवती ओलावा टिकून ठेवण्यासाठी काडीकचरा खोडाभोवती जमा करून आच्छादन करावे.
३) पावसाळापूर्वी खोडांना व रोपांना बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यसाठी १% बोर्डोपेस्ट खोडावर लावावे.
४) खत व्यवस्थापनात कुजलेले शेणखत @५ किलो किंवा गांडूळ खत @५०० ग्रॅम/झाड या प्रमाणे द्यावेत.
५) आतापासून जेवढ्या जास्त प्रमाणात शेंद्रीय खतांचा वापर केल्यास बागेचा आयुर्मान वाढण्यास मदत होईल.