खोड किड् लागली आहे

उपाय सांगावा

खोड कीड व्यवस्थापन:

  • ऊसात पोंगेमर झालेले असल्यास जमिनी लगत काढून नष्ठ करावी.

  • खोड किडीचे पंतग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी @२५ कामगंध सापळे प्रस्थापित करावे.

  • खोड किडीचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी बाळभरणी करावी.

  • रुंद (४.५ फुट) व खोल सरी आणि लागणीचे अंतर १.५ टे २ फुट ठेवल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

  • खोड किडीच्या नियंत्रण करिता क्लोराँट्रानिलिप्रोल ०.४%@१० किलो/एकरी या प्रमाणे लागवडी दरम्यान किवा लागवडी नंतर ३० दिवसांनी मातीत मिसळून द्यावे.

  • खोड किडीच्या नियंत्रण करिता क्लोरपायरीफॉस २०% ईसी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा

  • खोड किडीच्या नियंत्रण करिता फिप्रोनील ५% एससी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.