कीड व रोग

शेवगा पिकाला १.५ महिना झाले असून फांदी ला टोकरले जात असून कालातरणे रोप वाळत आहे. कृपया उपाय सुचवा.

खोड कुज (कॉलर रॉट) रोगाची लक्षणे आहेत.

मुख्य रोग मूळकूज किंवा खोडकूज खोडाजवळ जास्त काळ ओलावा राहिल्यास किंवा खोडावर सतत पाणी पडत राहिल्यास खोडकूज होऊन झाडे मरतात.

उपाय

  • लागवडीपूर्वी जमिनीमध्ये प्रति १०० किलो कुजलेल्या शेणखतामध्ये ८ ते १० किलो ट्रायकोडर्मा प्लस रात्रभर मुरवून दुसऱ्या दिवशी वापर करावा.
  • खोडाजवळ सतत पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी ड्रीपर झाडापासून दूर राहतील, याची दक्षता घ्यावी.
  • उभ्या पिकामध्ये झाडांची खोडकूज होऊन मर होण्यास सुरुवात झाल्यावर, फोसेटील एएल किंवा मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) यापैकी एक बुरशीनाशक ५०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी ठिबकद्वारे सोडावे.
  • ठिबकमधून मायक्लोब्यूटॅनील ५० ग्रॅम किंवा ॲझॉक्सिस्ट्रोबीन १०० मिलि प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून प्रति एकरी सोडावे.

फवारणी करताना द्रावण खोडावरून ओघळूनजमिनीत जाईल अशा पद्धतीने करावी.