टोमॅटो पिकातील मर

टोमॅटो पिकातील मर रोग आणि त्यावर उपाय

टोमॅटो पिकात मर रोग दोन प्रकारचे होतात.

एक जीवाणूजन्य आणि दुसर बुरशीजण्य.

दोन्ही रोगाची एकत्रित नियंत्रण करणे आवश्यक आहे.

१) तत्काळ रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
२) ५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्यादिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ठिबक द्वारे आवळणी करावी.

३) जीवाणूजन्य रोग नियंत्रण करिता व्हालीडामायसीन @१०० ग्रॅम + ब्लू कॉपर @५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर क्षेत्रासाठी सोडावे.

४) टोमॅटो पीक जर मल्चिंग पेपरवर लागवड केलेली असेल तर पिकाच्या बुडाजवळ पेपरला दोन -तीन ठिकाणी छिद्र करावे त्यामुळे जमिनीची तापमान नियंत्रण करणे सोपे जाईल.

५) पाण्याचा वापर गरजेनुसारच (पीक वाफसा अवस्थेत आल्यावर) करावा अति जास्त वापर करणे करावे.