या मिरची पिकावर कोणती फवारणी करावी
आणि कोणते खतांचा डोस द्यावा
मिरची पिकावर थ्रिप्स (फुलकिडे) व बोकड्या (चुरडा-मुरडा)रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
नियंत्रण करिता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
खतांचे डोस खालीलप्रमाणे द्यावे.
- जमिनीतल जिवाणूंची कार्यक्षमता वाढीसाठी मायकोराईझा@ २.५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे प्रति एकर क्षेत्रासाठी सोडावे.
- सुरुवातीच्या काळात रोपांची जोमदार वाढीसाठी व पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आणि मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होण्यासाठी ह्यूमिक अॅसिड @ १.५ किलो, सोबत १९: १९:१९ या विद्राव्ये खतांची @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे.
- पिकात कळी निघण्यासाठी व फुलांची संख्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये @ ५०० ग्रॅम + फ्लुविक अॅसिड/अमिनो अॅसिड@ १.५ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून मिसळून प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे.
- पीक फुलोरा अवस्थेत असताना १३: ४०:१३ @५ किलो + फ्लुविक अॅसिड@१.५ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे (प्रत्येक तोडा झाल्यानंतर ठीबकद्वारे व्यवस्थापन करावे).
- फळांचे आकार व वजन वाढीसाठी ०.०.५० विद्राव्ये खत @५ किलो २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर ठिबकद्वारे सोडावे