भुईमुग

मला उन्हाळी भुईमुग लागवड करायची आहे ,कोणता महिन्यात करू v व्हरायटी कोणती वापरू कमी कालावधी ची पाहिजे

शिफारशीत वाण: भुईमूगाचे वाणनिहाय बियाणे प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे वापरावे.
(हेक्टरी १०० किलो)
: एसबी - ११, टीएजी - २४, टीजी - २६.

हेक्टरी १२० ते १२५ किलोः
फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी-४१, फुले उनप, फुले उन्नती, फुले भारती.

वरील सर्व जाती उपटी प्रकारची आहेत.

या वरील सर्व जाती उन्हाळी लागवडीसाठी शिफारशीत आहे.
लागवड : १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, पेरणीचे वेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे.