गुलाबी अळी. उपाय सुचवा

आत्तापासून गुलाबी अळी दिसते. उपाय सुचवा.

2 Likes

ज्ञानेश्वर जी तुमची कपाशी पूर्व मोसमी लागवड केली आहे का ,म्हणजे मे महिन्याची शेवटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्व मोसमी कापूस लागवड केलेली आहे त्या पिकावर गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाचं शेतातील डोळ्याने दिसणाऱ्या डोमकळ्या हाताने वेचून नष्ट करावी. ( डोमकळ्या ओळखू येत नसेल तर मी त्याचा फोटो आपल्या कम्युनिटी फोरम टाकतो.)
२) गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय साठी कामगंध सापळ्यांचा एकरी @२० सापळ्यांचा वापर करावा.
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी अंडी नाशक + अळी नाशक असे कीटकनाशके फवारावे.

अंडीनाशक :1) Profenophos ५०%
ec
2) थायओडीकार्ब ७५%@ २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Sachinji 1 Jun ची लागवड आहे. 26July ला Ampligo ची फवारणी केली.

बहुतांश इतर शेतकऱ्यांच्या शेतावर पहाणी केली असता 11 - 12 Jun च्या कपाशीवरही फकडी व पाते गळ आढळून आले.

११-१२ जून ची लागवडीवर जे फकडी आणि पातेगळ होत आहे ती गुलाबी बोंड अळी मुळे होत नाही, ती ठिबक्याची बोंड अळी या मुळे होत आहे. आणि तुमच्या कपाशी मध्ये डोमकळी आहे आणि तुम्ही जर अमावस्या च्या दुसऱ्या दिवशी फवारणी केली असती तर आज अंपलीगो ची फवारणी करण्याची गरज पडली नसती. असो आता काळजी घ्या.
आपल्या कम्युनिटी फोरम च्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.

ज्ञानेश्वर जी आज मुद्दाम महीको कंपनी च्या जंगी या वाणाची लागवड केलेली
कापूस पिकाची पाहणी केली. कापूस फुलोरा अवस्थेत आहे बऱ्यापैकी , ११ जून ची लागवड केलेली आहे तर एकूण मी जेवढे कपाशी चे फुल पाहीले त्या पैकी फक्त एक ते दोन फुलात अळी नव्हती. सांगायचं तात्पर्य असे आहे की जंगी वान कमी दिवसात परिपक्व होणार वाण आहे , कोरडवाहू साठी या वाणाची शिफारस केलेली आहे.
आत्ता पासूनच गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव दिसून येत आहे जरा आपल्या पिकाची काळजी घ्या.

धन्यवाद !