उन्हाळी सोयाबीन साठी कोणते बियाणे वापरावे

सोयाबीन उन्हाळी कोणते बियाणे वापरावे

रब्बी/उन्हाळी हंगामात सोयबीन पाहिजे त्या प्रमाणात पीक जोमाने येत नाही. डिसेंबर महिन्यात जास्त थंडी असल्या कारणाने पिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

लेट रब्बी म्हणजे २० डिसेंबर ते १० जानेवारी पर्यंत सोयबीन ची लागवड करू शकता. हि लागवड केवळ बियाणे उपलब्ध करण्यासाठी करू शकता.

खरीप पेर सारखा उतारा येणे थोडे कठीण आहे कारण सोयाबीन हे उष्ण व आद्रयुक्त हवामानात,तसेच १८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात येणारे पीक आहे, थंड व कोरड्या हवामानाचा सोयाबीन पिकाच्या वाढीवर व फुल धारणेवर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे हीवाळ्यामधे सोयाबीन पिकाची वाढ होत नाही व फुलधरणा होत नाही.

पेरणीचे नियोजन असल्यास खालील जातीचा विचार करावा.

फुले संगम(केडीएस-७२६) ,M.A.U.S-71, 612, KDS-712** हे वाण सुद्धा उन्हाळी लागवडसाठी शिफारस केलेले आहेत.