बोकड्या पडला आहे मिरची वर

बोकड्या पडला आहे मिरची वर काय औषध करू

बोकड्या रोगाची तीव्रता अधिक आहे. रोगावर नियंत्रण करणे कठीण आहे. नियंत्रणाचे उपाययोजना केल्यास खर्च वाया जाऊ शकते.

नवीन लागवड करताना खालीलप्रमाणे उपाययोजना केल्यास रोगाची तीव्रता कमी करता येईल.

एकात्मिक उपाययोजना

अ) लागवडी दरम्यान करावयाच्या उपायोजना
१) नर्सरीतून रोपे आणल्यास निम तेल/करंज तेल @५ मिली/लिटर पाण्यात मिसळून रोपांवर फवारणी करावी.
२) रोपे लागवड करताना वरील शेंडा खुडणी करून लागवड करावी.
३) मिरची शक्य असल्यास मल्चिंग पेपर वापर करूनच करावी त्यामुळे रस-शोषक किडीचा उपद्र्व्य कमी करण्यास मदत होते.
४) रोपे लागवडीपूर्वी जमीनीत निंबोळी पेंढ @१०० किलो + कुजलेले शेणखत @५०० किलो/एकर मातीत मिसळून द्यावे.

ब) लागवडीनंतर उपाययोजना
१) लागवडीनंतर ८ दिवसानी ठिबकद्वारे मेटाऱ्हायझीयम अनिसोपिली @१ लिटर + बेवेरिया बसियाना @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे/आळवनीद्वारे करावी.
२) वरील नियोजन केल्यानतर रोगर @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३) शेतात ठिकठिकाणी एकरी @२० निळे/पांढरे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
४) पहिली फवारणी करताना वर्टीसेलियम लेकॅनी @१०० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) रोगग्रस्त (कोकडा) झाडे काढून त्वरित नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडांवर रोगांचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
६) लागवडीनंतर १५ दिवसांनी सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७) ब्रोफ्लानिलाइड ३००% एससी (एक्सपोनस) @३ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.