ऍन्थ्रॅकनोज (पीळ पडणे) रोगाची लक्षणे आहेत.
रोगाचा प्रसार
या रोगाची वाढ ही पावसाच्या तीव्रतेवर, प्रमाणावर आणि वारंवार येण्यावर अवलंबून असते
• हा रोग पिकाला जमिनीतून संसर्ग करतो.
• जेव्हा वातावरणात जास्त आर्द्रता व २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान असते, त्या वेळी या रोगाचे संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
• रोगाचा संसर्ग झाल्यानंतर तो पावसाद्वारे, वाऱ्याद्वारे किंवा सिंचनाच्या पाण्याद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.
उपाययोजना
१)त्वरित २५ ते ३० दिवसांनी ट्रायसायक्लॅझोल@२५ ग्रॅम (ब्लास्टीन) + इसबिओन @४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) लगेच ५-६ दिवसांनी करपा रोगाच्या नियंत्रणकरिता कब्रियो टॉप (Metiram 55% + Pyraclostrobin 5% WG)१० ग्रॅम किंवा बोनस (tebuconazole 38.9% SC)@१० मिली + फिप्रोनील ५% @४० मिली + इसबिओन @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
गरज पडल्यास पुन्हा फवारणीचे नियोजन करावी.
फवारणीमध्ये अधून मधून सूक्ष्म अन्नद्व्य्रे मिसळून फवारणी केल्यास दुहेरी फायदा होतो.