हुलगा पिक- कीड व रोग

सदर पीक हुलगा असून ३० दिवस झाले आहेत. काही पाने कुरतळलेली आहेत, आकसलेली आहेत व काही पिवळे झाली आहेत? कृपया,कारणे व उपाय सुचवा?

1 Like

पिवळा मोसैक रोगाची लक्षणे आहेत या रोगाचा प्रसार पांढरी माशी व रस शोषक किडी मार्फत माफर्त होतो.

उपाययोजना

१) पिवळा मोसैकग्रस्त झाडे कमी असतील तर रोगग्रस्त झाडे काढून नष्ठ करावी त्यामुळे निरोगी झाडावर विषाणू चा प्रसार होणार.

२) पांढरी माशी नियंत्रणासाठी व निरीक्षण करिता एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.

३) पांढरी माशी नियंत्रण करिता खालीलप्रमाणे नियोजन करावे.
अ) स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली , किंवा
ब) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम, किंवा
क) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली किंवा
ड )असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@५ ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तसेच पाने खाणारी अळी किडीने जर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर वरीलपैकी एका किटकनाशक सोबत इमामेक्टीन बेन्झोंएट ५% (मिसाईल, प्रोक्लेम)१० ग्रॅम/ १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.