हुलगा

सदर पिक हे हुलगा असून यावर वरील प्रमाणे बारीक किडे जमा होतायत.सदर प्लॉट मध्ये चालत असताना किडे उडतात.तर यावर मार्गदर्शन मिळावे व पर्याय माहिती मिळावी ही विनंती.

हुलगा पिकात प्राथमिक अवस्थेत रसशोषक किडचा ( तुडतुडे, पांढरी माशी) प्रादुर्भाव होतो.

व्यवस्थापन:
१) शेतात ठिकठिकाणी ३०-४० निळे-पिवळे चिकट सापळे प्रस्थापिथ करावे.
२) शेतात १०-१५% कीडग्रस्त (पाने आकासलेली) आढळल्यास रासायनिक कीटनाशकाची फवारणी करावी.
३) फ्लोनिकमाईड ५०% (उलाला) @५ ग्रॅम किंवा थायमेंथॉक्झाम २५%(अॅक्ट्रा) @५ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३०%(रोगर) @३० मिली किंवा असिफेट ७५% एसपी (असाटाफ)@ २० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) वरीलपैकी एका किटकनाशकाची निवड करून सोबत अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

1 Like