कपाशी पिवळे पाने आले आहे

उपाय सांगणे 9359531931

3 Likes

स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता आहे.
बोंड वाढीच्या अवस्थेत पिकांना जास्त प्रमाणत अन्नद्रव्याची गरज भासते.
अशावेळी झाड पानांमधील अन्नद्रव्ये बोंडानां पुरविण्याचे काम करते म्हणून पानांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणत दिसून येते.

उपाययोजना
१) पाण्याची उपलब्धता असेल तर सध्या ठीबकद्वारे ०.५२.३४ @५ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एक एक क्षेत्रासाठी सोडावे.
२) पानामार्फत खत व्यवस्थापनात २% डीएपी (२०० ग्रम/१० लिटर पाणी) या प्रमाणत घेऊन ८-१० दिवसात दोन फवारणी करावी.
३) ओलीताचे सोय असल्यास खत व्यवस्थापन करावे. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत होते नियंत्रण करिता वेळोवेळी फवारणीचे नियोजन करावे.

धन्यवाद

1 Like