प्राथमिक अवस्थेत थोड्याफार प्रमाणात ओली/कोरडी मूळकुज ची लक्षणे दिसतात.
खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
-
कॉलर रॉट/रुट रॉट :
-
या रोगाची लक्षणे पेरणीनंतर रोपे अवस्थेत पासून ते पीक ६ आठवड्यापर्यंत रोगाची लक्षणे दिसू लागत.
-
सुरुवातीला रोपे पिवळी पडतात, शेतात ठीकठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात या रोगाची लक्षणे दिसतात.
-
रोपांच्या खोडाला व मुळाला जोडणारा भाग हळू-हळू सडन्यास सुरुवात होते. तसेच पांढरा थर तयार होतो. कालांतराने झाड वाळून संपूर्णपणे मरण पावते.
-
मर- रोग:
-
मर रोगाची लक्षणे हरभरा पिकात रोपे ते फुलरा व घाटे भरणी अवस्थेत मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
-
रोपांचे जमिनी वरचा भाग, खोड व पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
-
कोवळी रोप सुकतात
-
रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद केल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.यामुळे अन्ननलिका बंद पडते परिणामी रोपे वाळतात व उत्पादनात मोठी घट येते.
-
उपाययोजना:
-
रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त रोपे काढून नष्ट करावे त्यामुळे निरोगी झाडावर प्रसार होणार नाही.
-
रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी/सुडोमोनस@१५० ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाजवळ आवाळणी घालावी.
रेडोमिल गोल्ड / कार्बोक्झीन बुरशीनाशक @१०० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी स्पॉट ड्रेंचींग करावी.