आंबा

आंबा फांदी मोडल्यानंतर आत मध्ये असं निघत आहे. व पालवी फुटली नाही. उपाय सांगा

खोड किडीची लक्षणे आहेत.

आंब्यावरील खोड कीड ही जास्त उपद्रवी कीड आहे. या किडीला ‘‘भिरुड कीड’’ असेही म्हणतात. अळी प्रथम आतून साल खाते व नंतर खोड पोखरून आत शिरते. झाडाच्या आतील भाग खाते. खोड कीड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा व विष्ठा बाहेर येते. वेळीच नियंत्रण न केल्यास संपूर्ण झाड वाळते.

उपाययोजना

  • या किडीच्या नियंत्रणासाठी टोकदार तारेने झाडाच्या छिद्रातील जिवंत अळ्यांचा भोसकून नाश करावा.

  • खोडावरील ओल्या छिद्रात १० लिटर पाण्यात १० मिली डायक्लोरोव्हॉस किंवा क्लोरोपायरीफोस आणि ५० मिली रॉकेलचे एकत्रित द्रावण इंजेक्शनच्या साहाय्याने ओतावे.

  • ट्रोल-रॉकेलमध्ये भिजवलेले कापसाचे बोळे छिद्रात टाकून छिद्रे चिखलाने बंद करावीत. जुलै-ऑगष्ट महिन्यात व त्यानंतर महिन्यातून किमान एकदा खोडाचे निरीक्षण करून उपाय योजावेत.

  • खोडाभोवती हलकी चाळणी करून स्वच्छता ठेवावी. ऑक्टोबर महिन्यात खोडावर जमिनीपासून ४-५ फूट वर किंवा उपपफांद्यांपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. बागेतील झाडांची नेहमी पाहणी करावी.