कारल्याच्या पिकाला अशाप्रकारे पाने कोकडत आहे सेंद्रिय कोणते औषध फवारावे. निमार्क चालेल का. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने लागवड आहे. घरगुती भाजीपाला केलेला आहे.
कोकडा हा रोग आहे. या रोगाचा प्रसार पांढरीमाशी या रसशोषक किडीमुळे होतो. रोगग्रस्त पाने काढून नष्ट करा त्यामुळे नवीन वेलीवर रोगाचा प्रसार कमी होईल.
निंबोळी अर्काने थोड्याफार प्रमाणात नियंत्रण मिळू शकते. त्याचा वापर करू शकता.