1 Like
वांगे पिकामध्ये रसशोषक किडी, बुरशीजन्य रोग, अन्नद्रव्ये कमतरता किंवा वातावरणातील बदल आणि पाण्याची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे फुलगळ होत असते. यासाठी पिकामध्ये अशी समस्या दिसून येताच पिकाचे निरीक्षण करावे व नेमके कारण काय आहे समजून घेऊन योग्य त्या कीटक/बुरशीनाशकांचा वापर करावा. फुलांची सेटिंग व्यवस्थित न झाल्यास किंवा परागीभवन न झाल्यास फुलांचे गळ मोठ्या प्रमाणात होते.
उपाययोजना
१) पाण्याचे नियनमित नियोजन करावे व अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी.
२) शक्य झाल्यास मधमाशी संगोपन करावे.
३) किडींचे नियमित सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.