अंबिया बहार

मोसंबी 200 झाडे आहे अंबिया बहार धरायचा आहे कधी धरावे व पाणी नियोजन व खत नियोजन कसे करावे

|

बहार महिना (फुलधारणा) फळ येण्याचा कालावधी ताण देण्याचे महिने
आंबे बहार (नैसर्गिक बहार) जानेवारी- फेब्रूवारी जुन- जुलै नोव्हेंबर- डिसेंबर
II. बागेतील ताण सोडणे:
1. सतत बहार न घेता वर्षातून कोणतेही एक बहार निवडून बागेचे व्यवस्थापन करावे. त्यामुळे बागेच एकूण आयुष्यमान वाढते.
2. नैसर्गिक ताण आंबे व मृग बहारात पाहण्यास मिळतो.
3. २५% झाडांची पानगळ झाल्यास बागेस संपूर्ण ताण बसलं समजावं.
4. बागेतील ताण सोडताना कमी प्रमाणात पाणी व्यवस्थापन म्हणजेच अंबवणी केले पाहिजे. (अंबवणी म्हणजे पाणी झाडापर्यंत पोहचले कि बंद करणे)
5. ताण सोडताना एकदम जास्त प्रमाणात पाणी दिल्यास झाडांना शॉक बसू शकतो. त्यामुळे झाडांना एकदम जास्त प्रमाणात एकदम पाणी देऊ नये
6. पाऊस पडल्यास (लिहोसीन)ची फवारणी करावी.
7. १०- १५% पानगळ झाल्यास शेतात अंतरमशागत करावे व नंतर खोडावर बोर्डोपेस्ट लावावी.
8. वाळलेली फांद्या कापुन नष्ट करावी.
9. १३:००:४५ @२०० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मोसंबी बहार व्यवस्थापन

  1. बहार कसा धरावा :
    • उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत चालू राहते.त्यामुळे सतत फुले येतात. फुलधारणा भरपूर होत नाही.
    • फुलधारणा होण्यापूर्वी मोसंबीच्या झाडांना विश्रांतीची आवश्यकता असते. ही विश्रांती नैसर्गिकरीत्या मिळत नसल्याने कृत्रिमरीत्या बहार धरण्याची प्रक्रिया करावी लागते.
    • हिवाळ्यात तापमान कमी होत असल्याने झाडांची वाढ थांबते व मोसंबीची झाडे सुप्तावस्थेत जातात म्हणजेच झाडांना विश्रांती (ताण) मिळते. तापमान वाढल्यावर पुन्हा पालवी फुटण्यासाठी बहार येतो.
    • मोसंबीच्या झाडांना ताण दिला नाही आणि त्याची वाढ अनियंत्रित ठेवली तर झाडावर दुष्परिणाम दिसून येतात जसे मोसंबीच्या झाडास वर्षभर सतत फुले येतात, एका बहराची फुले झाडावर असतांना दुस-या बहराची फुले कमी लागतात, झाडावर येणा-या सततच्या फुला फळामुळे झाडावर परिणाम होतो व झाड कमकुवत बनते, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि मोसंबीच्या फळांची प्रत चांगली राहत नाही. ताणाचा कालावधी हा भारी पण उत्तम निच-याची जमीन, पाऊसमानानुसार आणि वेगवेगळ्या हवामानात कमी अधिक होऊ शकतो

  2. झाडाला ताण बसला हे कसे ओळखावे:

• लागवडी नंतर पहिल्या तीन वर्शत झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देवून कमी प्रमाणत फळे घ्यावीत.
• ताण सुरु करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत, बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे. ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या वयानुसार कमी जास्त होऊ शकतो.
• ताण सुरु केल्यानंतर पानाचा मूळ रंग कमी होऊन फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असतांना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात.
साधारणपणे पंचवीस टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे, पानांनी तयार केलेले कर्बयुक्त अन्न झाडांच्या फांद्यात साठते.
• या कर्बयुक्त अन्न पदार्थाचा उपयोग झाडांना नवीन पालवी फुटण्यास फुले येण्यास, फळधारणा होण्यास मदत होते.
• अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो. ताण जरुरीपेक्षा जास्त बसणार नाही याची काळजी घ्यावी.

ताण कसा सोडावा?
• आंबे बहरासाठी मोसंबी बागेस ताण दिला असेल तर विहिरीचे हलक्या प्रमाणात पाणी देऊन ताण सोडवा.
एकदम पाणी दिल्यास झाडांना शॉक बसू शकतो.
यावेळी भरखते, संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्ध नत्र देवून आंबवणी धावे, त्या नंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिबवनी ) द्यावे.
• तीस-या पाळीला भरपूर पाणी घ्यावे, ताण सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी फुले येतात. यानंतर उरलेल्या नत्राचा (निम्मा हप्ता एक ते दीड महिन्यानी द्यावा.
• हलक्या जमिनीत नत्राच्य मात्रा ह्या तीन चार हप्त्यात विभागून द्यावा, आंबे बहराच्या मोसंबी बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहार ठरतो.
• मात्र मृग बहाराच्या बागेस ताण सोडण्याची प्रक्रिया ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बहार खात्रीचा ठरत नाही.
• मृग बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण सुरु केल्यानंतर झाडावर वाजवीपेक्षा जास्त ताण आला तर काही करता येत नाही.
• एकतर विहिरीला पाणी कमी असले तरी शेतकरी हा मृग बहार घेतात आणि विहिरीला जरी पाणी असले तरी बागेस जास्त ताण बसल्यावर विहिरीचे पाणी देण्याची व्यवस्था केली तरी फायदा होत नाही.
• बाहेरचे तापमान खूप जास्त असल्याने पाणी देऊन बाग ताणाच्या धोक्यापासून वाचविली तरी आलेली फुले टिकत नाहींत. याशिवाय मृग बहारास वळवाच्या पावसामुळे धोका निर्माण होतो मध्येच बागेची ताणाची स्थिती बिघडते आणि नुकसान होते. करिता मोसंबी बागेस ताण देण्याचे योग्य नियोजन असावे.

खत व्यवस्थापन