फुल गळ होत आहे

फुल येऊन गळून जातात सलग एक वर्षापासून होत आहे

1 Like

गरजेपेक्षा वाढ जास्त झाल्यास फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते.

उपापयोजना:
१)शेवगा लागवडीनंतर आवश्यक महत्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खताचा वापर, झाडाची योग्य छाटणी वा बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.
२)आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुध्दा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत.
तसेच दोन झाडाच्या ओळीत वखरणी करावी.
३)म्हणजे तणाचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते.
४)शेवग्याला प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे.
५)व्यवस्थित आकार दिला नाहीतर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते. यासाठी लागवडीनंतर चार महिन्यांनी पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे आणि चार दिशाला चार फांद्या वाढू द्याव्यात.
६)झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल. त्यानंतर ७ ते ८ महिन्यांनी चारीही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात.
७) त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल व झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल व उत्पादन वाढेल. पुढे झाड जसजसे जुने होईल तसतसे दर दोन वर्षांनी एप्रिल मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.

1 Like

प्लॅनोफिक्स 20मिली 200लिटर पाणी फवारणी करावी