दहिया (ग्रे मिल्ड्यू) रोगाची लक्षणे आहेत.
लक्षणे:
• रोगट पानांवर दही शिंपडल्यासारखी दिसून येतात म्हणून त्यास दहिया रोग म्हणतात.
• जुन्या पानांवर बारीक त्रिकोणी आकाराचे हलक्या पांढऱ्या रंगाचे ठिपके पानांवर दिसतात.
रोग वाढीस अनुकूल परिस्थिती|
|•|अधूनमधून पडणारा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रोग वाढीस अनुकूल ठरते.|
|•|सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात रोगाची तीव्रता जास्त असून २० ते ३२0C तापमान रोग वाढीसाठी पोषक ठरते. |
|•|जास्त आद्रता ८५ ते ९१% आणि सोबत २३ ते २७ 0C तापमान दहिया रोग वाढीस कारणीभूत ठरते.|
उपाययोजना
• पिकास शिफारस केलेली नत्राची मात्रा द्यावी व अतिरिक्त नत्राची मात्रा देणे टाळावे.
• शेतातील रोगट पाला- पाचोळा गोळा करून नष्ठ करावे त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
• दहिया रोगाच्या नियंत्रण करिता अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२% + डायफेनोकोनॅझोल ११.४% एससी@ १० मिली किंवा क्रेसोक्झिम मिथिल ४४.३% एससी@ १५ मिली किंवा कार्बेन्डेझिम ५०% डब्लूपी @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.