सोयाबीन

सोयाबीन पाने काळे पडून गोळा होणे

ग्रीन मोटल व्हायरसची लक्षणे आहेत. सोबत पाने काळी पडणे व नंतर पांढरी पडणे हे भुरी रोगाचे लक्षणे असू शकतात.

ग्रीन मोटल व्हायरस रोगाचा प्रसार पांढरीमाशी व रसशोषक किडीमार्फत होतो.

उपाययोजना
आता पीक शेंगा भरणी ते काढणी अवस्थेत आहे. फवारणीचा फारसा प्रभाव रोगावर होऊ शकणार नाही.
रस शोषक कीड नियंत्रणासाठी :**

१ ) पिक वाढीच्या अवस्थेत जर एक दोन कोकडा ग्रस्त वेली दिसल्यास काढून नष्ट करावी.

२) रस शोषक कीड निरीक्षणासाठी व नियंत्रणासाठी एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.

  1. रश शोषक किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी

१ ) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम,

२ ) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली

3)असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@3 ग्रॅम

या प्रमाणात वरील सर्व प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कॉकटेल करून फवारणी केली तर चालते का दोन किंवा अधिक औषध

वरील दिलेल्या एका कीटकानाशका सोबत एक बुरशीनाशक व विद्र्यावेखत घेऊ शकता.