कापूस पिकातील नैसर्गिक पातेगळ व्यवस्थापन:**

**

कारणे:

  • दीर्घकालीन पावसाचा खंड व अचानक पाऊस पडणे.
  • कायिक वाढ जास्त होऊन पीक दाट होणे.
  • अन्नपुरवठा कमी असल्यास झाडामध्ये अन्नद्र्व्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा.
  • कमी सूर्यप्रकाश, पाण्याचा ताण पडणे इत्यादी.
  • रिमझिम पाऊस असल्यास कपाशीचे फुल पातेला चिटकून राहणे.
  • कीड व रोगाचा प्रादुर्भाव
  • परागीभवनाचा अभाव
  • वरील सर्व घटकाने कपाशित पातगळ होऊ शकते.

उपाययोजना

  • पावसाचा खंड व जास्तीचे पाऊस असल्यास पीक मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्यात अडचणी येतात त्यामुळे पिकांना पानाद्वारे खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
  • अन्नद्रव्ये व्यवस्थापनात विद्राव्ये खते @१३:४०:१३, ०:५२:२४, १३:०:४५ १९:१९:१९ या पैकी कुठलेही एक @१०० ग्रॅम /१५ लिटर + नॅपथेलिन सीटीक सीड (एनएए)@५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.
  • परागीभवनाचा अभाव असल्यास बोरॉन @२० ग्रॅम + सोबत आवश्यक असल्यास किटकनाशक किंवा बुरशीनाशक घेऊन फवारणी करावी.
  • २% DAP + नॅपथेलिन सीटीक सीड (एनएए)@५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रसशोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
  • वरीलप्रमाणे महिन्यातून २-३ वेळा वरील प्रमाणे नियोजन केल्यास पातेगळ कमी करता येईल.