कोणती किटकनाशक फवारणी करावी

पानें वाकडे होत आहे

मागील बऱ्याच दिवसापासून पावसाची उघडीप असल्याने कपाशीवर फुलकिडे रसशोषक किडीचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेलं आहे. किडीने सध्या आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडली आहे. त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा उत्पादनात मोठ्या प्रमाणत घट होऊ शकते.
लक्षणे:
१) कीड पानाखाली राहून पाने खरडून त्यातील रस शोषण करतात परिणाम पोन लाल होते व पानांना चकाकी येते.
२) पाने कडक होतात व आकसतात.
३) किडीची तीव्रता जास्त असल्यास पाने फाटतात.

उपयोजना:
१) सध्या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्याने त्वरित शिफारशीत केलेले किटकनाशकाची फवारणी करावी.
२) फुलकिडे नियंत्रण करिता रीजेंट/आगाडी/महावीर (फिप्रोनील ५% एससी)@५० मिली किंवा यमराज (TOLFENPYRAD 15% EC)@४० मिली किंवा बायो ३०३ @२५ मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) शेतकरीवर्ग सध्या फुलकिडे नियंत्रण करिता बाजारात उपलब्ध असलेले पोलीस, लेसेंटा (फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्राईड ४०%) या घटकाची फवारणी करत आहे. ते किटकनाशक कपाशीवर शिफारस नाही. फवारणीचे नियोजन असल्यास आवश्यक संरक्षित कीटचा वापर करून फवारणी करावी.त्यामुळे विषबाधा होणार नाही.