पुढे कोणता रोग येऊ नये या करिता काय काळजी घ्यावी

काळजी काय घ्यावी

2 Likes

• हलक्या ते मध्यम पाऊसाची शक्यता लक्षात घेता आवश्यकतेनुसार बाह्य स्त्रोतातून पाणी घेवून
भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.
• भात पिकावर सुरळीतील अळीआणि खोडकीड यांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने पिकाचे किडीच्या प्रादुर्भावाकडेसातत्याने निरीक्षण करावे.
• वाढते कमाल तापमान आणि प्रखर सुर्याप्रकाशाचे तास वाढीमुळे भात पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून खोडकिडीची अळी प्रथम कोवळ्या पानावर उपजीविका करते आणि नंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खाण्यास सुरुवात करते.
यामुळे रोपाचा मधला भाग वरून खाली सुकत येतो यालाच गाभा मर असे म्हणतात.
लावणी नंतर शेतात ५ टक्के किडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक
अंडीपुंज आढळून आल्यास उपाय योजना कराव्यात.
कारटॅप हायड्रो क्लोराईड ४ टक्के दाणेदार १८८ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रोनीलीपोल ०.४ टक्के दाणेदार १०० ग्रॅम किंवा फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार २०८ ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणात दाणेदार कीटकनाशक जमिनीत पूरेसा ओलावा असताना द्यावे.