हे कशाने होत आहे

निवारण होण्यासाठी काय उपाययोजना करावी

1 Like

कपाशीचा सुरुवातीच्या अवस्थेत पावसाची विश्रांती व नंतर रिमझिम पाऊस यामुळे कापसात मॅक्रोफोमिना फेसोलिना या बुरशीची वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कापसावर कापूस पुन्हा घेतले असलेल्या शेतात हे प्रमाण जास्त आहे. सध्याची हवामान परिस्थिती अतिशय अनुकूल आहे अशी शक्यता वाटते. कृपया प्रभावित झाडाच्या मुळांचे निरीक्षण करा. मुळांची वाढ कमी असेल व खोडावर किंवा मूळवरती पांढरी बुरशीची वाढ असेल तर खालीलप्रमाणे उपाययोजना करणे आवश्यक आहे.

उपाययोजना
१) लक्षणे असलेल्या झाडांना आणि आजूबाजूच्या झाडांना कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी @ ३० ग्रॅम + ह्युमिक असिड @३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या खोडाला आळवणी घालावी.
२) वरीलप्रमाणे उपयोजना केल्यानंतर ४-५ दिवसांनी ब्लू कॉपर @३० ग्रॅम + ह्युमिक असिड @३० ग्रॅम/ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या खोडाला आळवणी घालावी.
३) खत व्यवस्थापन युरिया २० किलो + पोटाश @२५ किलो एकत्रित मिसळून झाडांना रिंगण पद्धतिने आळे करून घालावे व मातीत मिसळून द्यावे.
४) प्रादुर्भावग्रस्त कपाशीत अन्नद्रव्ये पानाद्वारे करणे गरजेचे आहे. त्यासाठी १९:१९:१९ विद्राव्ये खत @५० ग्रॅम + अमिनो असिड (PGR)@४९ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.