कोणती कीड आहे सांगा

फवारणी करावी का

आणि पाऊस नाही तर कोणती फवारणी करावी

1 Like

मित्र किटक आहे. (लेडी बर्ड बीटल) हि मित्र कीड रस शोषक करणाऱ्या कीडीवर आपली उपजीविका करते.

सध्या बऱ्याच भागात पावसाने उघडीप दिलेली आहे अशा परिस्थितीत खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

१) उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे
नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

२)मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, कापूस पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी
करावी.

३)पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे.