6 वर्षाचे आवळा झाड झाले असून फळ लागत नाही?

वर्षाचे आवळा झाड झाले असून फळ लागत नाही? काय करावे मार्ग दर्शन करावे ही नम्र विनंती

आवळा लागवडीनंतर ५-६ वर्षांनी फळे लागण्यास सुरुवात होते.

फळे न लागण्याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात.
१) लागवड केलेले झाडांची कलम वांज असू शकतात.
२) परागीकरण करिता अडथळा येणे किंवा फुल टिकून न राहणे.
३)अन्नद्रव्य कमरता, कीड व रोगांचे प्रादुर्भाव.
४) फुलगळ मोठ्या प्रमाणात होणे इत्यादी कारणे असू शकतात.

उपाययोजना
१) खत व्यवस्थापन करावे
२) शेणखत व कंपोस्ट खत @१० किलो/झाड या प्रमाणे करावे.
३) परागीकरण करिता शेतात मधमाशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी ठिकठिकाणी मधमाशी पेट्या ठेवावेत.
४) कीड व रोग करिता वेळोवेळी निरीक्षण करून आवश्यक त्या उपायोजना कराव्यात.
५) पावसाळ्यापूर्वी झाडांची वाढलेल्या फांद्या कापून बोर्डो पेस्ट लावावे.

खूप खूप धन्यवाद