रोग सूचवा

वरील कपास या झाडावरील,रोग , व त्यावरील उपाय व औषध सूचवा .
(विनंती)

२- ४ डी तणनाशकामुळे झालेले आहे.
जवळपास कोणी चुकून २- ४ डी तणनाशकाचे कण हवेद्वारे उडून पानावर पडल्यास पाने फोटोप्रमाणे होतात.

नियंत्रण करिता २% डीएपी (२०० ग्रॅम )+ इसबिओन @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५-६ दिवसाने दुसरी फवारणी करावी.
पाणी असेल तर पाणी व्यवस्थापन करा, लवकर recover होईल.

खत व्यवस्थापणात २४:२४:०० एकरी @५० किलो + प्लॅन्टो @२५ किलो/एकरी या प्रमाणत घेऊन मातीत मिसळून द्यावे.

धन्यवाद ,साहेब.खूप छान माहिती दि्याबद्दल.धन्यवाद.