वाल पिवळा पडत आहे
शेंग पिवळी दिसते यावर उपाय
मोसाईक रोगाची लक्षणे आहेत.
वाल पिकांवर पिवळा मोसाईक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या रोगाचा प्रसार रसकिडी मार्फत होतो.
या रोगाची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसत आहे या अवस्थेत नियंत्रण मिळवणे कठीण आहे.
उपाययोजना
१) प्रादुर्भावग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे निरोगी झाडांवर प्रसार कमी होईल.
२) रस शोषक किडीच्या नियंत्रण करिता शेतात ठिकठिकाणी निळे-पिवळे चिकट सापळे@२०/एकर प्रस्थापीत करावे.
३) निम ओईल + करंज ओईल + उलाला @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.