केळी रोग

केळीवर कोणता रोग आहे व त्यावर उपायोजना काय करावी

सीएमव्ही (कुकुम्बर मोसाईक व्हायरस) रोगाची लक्षणे आहेत.
रोगाचा प्रसार प्राथमिक अवस्थेत रोगग्रस्त बेणे मार्फत होतो व नंतर मावा या रस शोषक किडीमार्फत होतो.

व्हायरसचा शिरकाव झाल्यास रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

उपाययोजना
१) या अवस्थेत नियंत्रण करणे कठीण आहे, तरी प्रादुर्भावग्रस्त झाडांवरून निरोगी झाडांवर प्रसार होऊ नये या करिता काळजी घेणे गरजेचे आहे.
२) प्रादुर्भाव ग्रस्त फांद्या व झाडे काढून नष्ट करावी.
३) रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा कीड नियंत्रण करिता शेतात ठिकठिकाणी चिकट सापळे लावावे.
४) जर नवीन लागवड करत असल्यास रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे.
५)मावा किडीच्या नियंत्रण करिता रोगर @४० मिली किंवा मिथिल डेमीटोन @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.