मागील 6/8/2023 रोजी उलाला, इसबेन, आलिक ही फवारणी केली आहे तरी पिकाच्या शेंडयाला मावा आहे त्या साठी काय करावे उपाय सुचवा
सध्या कपाशीवर फुलकिडे व मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय.
उपाययोजना
१) शेतात ठिकठिकाणी निळे पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावे.
२) * व्हर्टिसिलियम ) लेकॅनिसिलियम लेकॅनी @५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
३) रस शोषक किडीने आर्थिक नुकसानची पातळी ओलांडल्यास (५मावा/पान) तर खालीलशिफारसी प्रमाणे फवारणी करावी.
४) रीजेंट (फिप्रोनील ५%) @४० मिली + असाटामाप्रीड २०% एसपी @१० ग्रॅम + बायोविटा @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.