रोपांचे शेंडे वाळत आहे

जागोजागी रोपे जाळून टक्कल पडत होते त्या मुळे,बुरशी नाशक,कीटक नाशक फवारणी केली होती?

बियाणे टाकल्यानंतर किंवा रोपाची पुनर्लागवड केल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी ट्रायकोडर्मा एक किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन पाटपाण्याद्वारे ड्रेचिंग (आळवणी) करावे. एकसमान कव्हरेज असावे.

रासायनिक बुरशीनाशकांचा वापर प्रमाण प्रति लिटर पाणी

(फवारणी करताना एकसमान व संपूर्ण रोपे कवर होईल या पद्धतीने करावी.)

अ) बियाणे टाकल्यानंतर किंवा रोप लागवडीनंतर १०-१२ दिवसांनी - मॅन्कोझेब २.५ ग्रॅम

ब) २५ ते ३० दिवसांनी - ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम

क) ४०-४५ दिवसांनी हेक्झाकोनेझोल १ मि.लि.

ड) ६० ते ६५ दिवसांनी अॅझॉक्सीस्ट्रॉबीन ०.५ मि.लि.

धन्यवाद