किड

किड लागुन खालील गळत आहे कोणते औषध फवारणी करावी ते सांगा

फळ पोखरणारी अळी आहे.

उपाययोजना
१) प्रादुर्भाव फळे अळी सहित वेचून नष्ट करावे.
२) शेतात एकरी @२० -३० पक्षी थांबे उभी करावी.
३) एकरी @५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
४) किडीची आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडली असेल तर इमामेक्टीन बेन्झोएट @१० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलगळ व्यवस्थापन
टोमॅटो पिकामध्ये रसशोषक किडी, बुरशीजन्य रोग, अन्नद्रव्ये कमतरता किंवा वातावरणातील बदल आणि पाण्याची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे फुलगळ होत असते. यासाठी पिकामध्ये अशी समस्या दिसून येताच पिकाचे निरीक्षण करावे व नेमके कारण काय आहे समजून घेऊन योग्य त्या कीटक/बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच पाण्याचे नियनमित नियोजन करावे व अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी.