सोयाबीनवर पिवळा मोझॅक या रोगाची लक्षणे दिसत आहे.
यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे.
व्यवस्थापन:
१) या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
२) लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.
३) मोझॅक(केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी काढून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.
४)पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी २० पिवळे चिकट सापळे लावावेत.
५)कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे.
६) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली किंवा असिटामिप्रीड २५ टक्के अधिक बाइफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यूजी १०० ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ओडी १४० मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.