जागेवर जळत आहे

काही पर्याय आहे का

जीवाणूजण्य करपा रोगाची लक्षणे आहे.
उडीद पीकावर कोणत्याही अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

रोगाचा प्रसार
१) रोगाचा प्राथमिक अवस्थेतील प्रसार बियाणेद्वारे व नंतर जमिनिद्वारे होतो.
२) दमट / जास्त आद्रता, ढगाळ वातावरण व सतत पाऊस हे रोग वाढीची कारणे आहेत.

उपाययोजना
१) रोगाच्या नियंत्रणकरिता ब्लू कॉपर @४० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन @३ ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर अमिसस्टार @१० मिली + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.