हुमणी अळी नियंत्रण करिता अंतर मशागती दरम्यान डोळ्याने दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे. प्रभावी नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ५० % SC + सायपरमेथ्रीन ५ % ( हमला ) @१ लिटर /२०० पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे. किंवा क्लोथोडीयन ५० % (**#**डेंटासु )१०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
पिकांची मुळे उकरून पहा हुमणी अळी नसेल तर आकस्मित मर रोगाची लक्षणे असू शकतात.
आकस्मित मर रोगाची कारणे**
दिवसाचे तापमान जास्त टिकून राहिल्यास तसेच पाण्याचा ताण बसल्यास आणि एकदम पाऊस पडल्यास कपाशीवर अनिष्ट परिणाम होतो. पाण्याचा तान बसल्यामुळे अन्नद्रव्ये शोषुन घेणाऱ्या नलिका बंद पडतात. त्यामुळे झाडे मरतात.
उपाययोजना
मरग्रस्त झाडांचे खोड दोन्ही पायाच्या मध्ये घेऊन झाडाच्या बुडाजवळ घट्ट दाबावे त्यामुळे ढिल्या झालेल्या मुळ्या पक्की होतील.
प्रभावी नियंत्रण करिता २० ग्रॅम युरिया + २० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम (ब्लू कॉपर) /लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुडाला १५-२० मिली आळवणी घालावी.
किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% @ १०० ग्रॅम + ह्युमिक असिड @५० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून बुडाला प्रत्येकी २० ते ३० मिली आळवणी घालावी.
कापसाच्या झाडाजवळील माती घट्ट दाबल्यामुळे ते झाडे सावरले व हिरवे झाले पिकासाठी योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद