कांदा रोप मर

15 दिवसांचे कांदा रोप आहे मर होते आहे.

2 Likes

ऍन्थ्रॅकनोज (रोपे कोलमडणे) रोगाची लक्षणे आहे.

रोगाची कारणे

१) हा रोग जमिनीमध्ये पिकाच्या अवशेषांमधून नंतर रोपांद्वारे किंवा कांद्याद्वारे पसरतो.
२) अन्य शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार हा रोग किंव बियाण्यामार्फत सुद्धा पसरू शकतो.
या रोगाची वाढ ही पावसाच्या तीव्रतेवर, प्रमाणावर
आणि ढगाळ वातावरण येण्यावर अवलंबून असते.

एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन

१) पावसाचे साचलेले पाणी काढून टाकावे.

• पीक फेरपालट करावी. पीक अवशेष काढून टाकावेत.

गादीवाफ्यावर नर्सरी तयार करावी. किंवा रोपांची पुनर्लागवड करावी. • रोगाला प्रतिकार करणाऱ्या जातींची निवड करावी. उदाहरणार्थ : भीमा राज, भीमा श्वेता.

• बी प्रक्रिया : कार्बेनडाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.

• रोप प्रक्रिया कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रोपे त्या द्रावणामध्ये १० ते १५ मिनिटे बुडवून नंतर पुनर्लागवड करावी.

• बियाणे टाकल्यानंतर किंवा रोपाची पुनर्लागवड केल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी ट्रायकोडर्मा एक किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन पाटपाण्याद्वारे ड्रेचिंग (आळवणी) करावे. एकसमान कव्हरेज असावे.

रासायनिक बुरशीनाशकांचा वापर प्रमाण प्रति लिटर पाणी

(फवारणी करताना एकसमान व संपूर्ण रोपे कवर होईल या पद्धतीने करावी.)

अ) बियाणे टाकल्यानंतर किंवा रोप लागवडीनंतर १०-१२ दिवसांनी - मॅन्कोझेब २.५ ग्रॅम

ब) २५ ते ३० दिवसांनी - ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम

क) ४०-४५ दिवसांनी हेक्झाकोनेझोल १ मि.लि.

ड) ६० ते ६५ दिवसांनी अॅझॉक्सीस्ट्रॉबीन ०.५ मि.लि.

टीप : बुरशीनाशकांच्या शिफारशी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अंतर्गत आहेत. फवारणीच्या द्रावणात सिलिकॉन आधारित स्टीकर वापरावे. रोगाच प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड असते. त्यामुळे प्रतिबंधकात्मक म्हणून लेखात दिलेल्या व्यवस्थापनाचे काटेकोरपणे पालन करावे.

1 Like